22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरडॉ. सूर्यकांत घुगरे यांना जीवनगौरव पुरस्कार

डॉ. सूर्यकांत घुगरे यांना जीवनगौरव पुरस्कार

बार्शी : समाजशास्त्र हे केवळ एक सामाजिक शास्त्र नसून ते प्रमुख व मूलभूत सामाजिक शास्त्र आहे. असा कोणताही सामाजिक विषय नाही की जो समाजशास्त्राचा अभ्यासविषय नाही. शिक्षकांचा सर्वोच्च सन्मान केलेल्या माजी राष्ट्रपती डॉ.राधाकृष्णन यांची प्रतिमा सर्वच शाळा महाविद्यालयांत असली पाहिजे असेही प्रतिपादन डॉ.सूर्यकांत घुगरे यांनी केले.

हिंगणघाट (विदर्भ) येथील मराठी समाजशास्त्र परिषदेच्या ३३ व्या वार्षिक अधिवेशनात बिडकर महाविद्यालय येथे ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ.उषाकिरण थुटे यांच्या हस्ते त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांतून एका व्यक्तीची निवड केली जाते. समाजशास्त्राचे अभ्यासक व संशोधकांसाठी हा सर्वोच्च प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो.

यावेळी अखिल भारतीय समाजशास्त्र परिषदेच्या अध्यक्षा मैत्रयी चौधरी, आमदार समीरभाऊ कुणावार, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाचे माजी कुलगुरु शरद निंबाळकर, प्राचार्य डॉ.राजूरकर, परिषदेचे अध्यक्ष डॉ.राहुल भगत, डॉ.अशोक बोरकर, डॉ.धनंजय सोनटक्के, डॉ.निखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सूर्यकांत घुगरे यांनी बार्शी येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ सेवा केली असून, त्यांनी समाजशास्त्र विषयासाठी विस्तृत संशोधनात्मक लेखन व चिंतन केले आहे. देशातील सर्वच धर्म व समाजांचे केलेले संशोधनात्मक व तुलनात्मक अध्ययन अशा विविध प्रकारच्या कार्यांची आणि योगदानांची दखल घेवून डॉ.सूर्यकांत घुगरे यांची िनवड करुन त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR