भुवनेश्वर : या वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्या दिवशी भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले. मंदिर प्रशासनाने सोमवारपासून (१ डिसेंबर) मंदिरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड अनिवार्य केला आहे. नवीन आदेशानुसार १२व्या शतकातील या मंदिराच्या आवारात गुटखा, पान, प्लास्टिक आणि पॉलिथिनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने यापूर्वी यासंबंधीचा आदेश जारी केला होता आणि पोलिसांनाही बंदीची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते.
श्री जगन्नाथ मंदिर प्रशानाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना सभ्य कपडे घालावे लागतील. हाफ पँट, चड्डी, फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस ड्रेस घालून मंदिरात येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. नियम लागू झाल्यानंतर, २०२४ च्या पहिल्या दिवशी, मंदिरात देवाची पूजा करण्यासाठी येणारे पुरुष भक्त धोतर आणि टॉवेल परिधान केलेले आणि महिला साडी किंवा सलवार कमीज परिधान केलेले दिसले. पहिल्याच दिवशी भगवंताच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली.