25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयदारुड्या पोलिसांचा मॉलमध्ये गोळीबार

दारुड्या पोलिसांचा मॉलमध्ये गोळीबार

नोएडा : उत्तर प्रदेश पोलिसांनी नवा कारनामा केला आहे. येथील नोएडामधील एका मॉलमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन पोलिसांनी रविवारी रात्री गोळीबार केला. नोएडाच्या सेक्टर-३८ मधील गार्डन गॅलेरिया मॉलमध्ये ही घटना घडली. या घटने नंतर दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले असून, दोघेही गाझियाबाद जिल्ह्यातील इंदिरापुरम पोलिस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. धीरज कुमार आणि मुकुल यादव असे या पोलिसांचे नाव असून दोघे एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. असे पोलिस अधिका-यांनी सांगितले.

सहाय्यक पोलिस आयुक्त (नोएडा) प्रवीण कुमार सिंह यांनी सांगितले की, या दोघांकडे सरकारी शस्त्रे होती. या शस्रामधून त्यांनी गोळीबार केला. या घटनेनंतर मॉलमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. यानंतर या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघांची ओळख पटली आणि सेक्टर-३९ पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला असून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे असे ही सहाय्यक पोलिस आयुक्त प्रवीण कुमार यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR