32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeअंतरराष्ट्रीयगर्दीमुळे माउंट एव्हरेस्टवरील बर्फाचा काही भाग कोसळला

गर्दीमुळे माउंट एव्हरेस्टवरील बर्फाचा काही भाग कोसळला

२ गिर्यारोहक डेथ झोनमध्ये पडले, शोध मोहीम सुरू एकाच दिवसात २०० गिर्यारोहक पोहचल्याने अपघात

काठमांडू : जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर जाम झाला आहे. एकत्रितपणे २०० गिर्यारोहकांनी ८७९० मीटर उंचीवर दक्षिण शिखर आणि हिलरी स्टेप गाठले. ८,८४८ मीटर उंच माउंट एव्हरेस्ट येथून २०० फूट दूर आहे. गर्दी जमल्याने येथे बर्फाचा काही भाग तुटला.

यावेळी ६ गिर्यारोहक तिथे अडकले. मात्र, यातील ४ जण दोरीच्या साहाय्याने परत वर येण्यात यशस्वी झाले. दोन गिर्यारोहक (एक ब्रिटिश आणि एक नेपाळी) हजारो फूट खाली पडले आणि बर्फात गाडले गेले. ही घटना २१ मे रोजी घडली होती, ज्याचा व्हीडीओ आता समोर आला आहे. चार दिवसांपासून बर्फात अडकल्याने दोन्ही गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. नेपाळच्या पर्यटन अधिका-यांनी सांगितले की, हे दोघेही एव्हरेस्टवर चढणा-या १५ गिर्यारोहकांच्या गटातील होते. जेव्हा बर्फाचा काही भाग तुटला तेव्हा ते दक्षिण शिखराच्या दिशेने पडले. याला टेकडीचा डेथ झोन म्हणतात, जिथे ऑक्सिजनची पातळी खूप कमी असते.

सर्च ऑपरेशन सुरू
साहसी कंपनी ८ के ने सांगितले की, बचावकर्ते दोन गिर्यारोहकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता त्यांच्या जगण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे. चढाईचे नेतृत्व करणा-या कंपनीने सांगितले की, हिलरी स्टेपवरून बर्फाचा तुकडा खाली पडला होता. तो शिखराजवळील बर्फाचा उभा भाग होता. येथून दोन्ही गिर्यारोहक तिबेटच्या दिशेने पडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR