छ. संभाजीनगर : नवरात्रोत्सवात नऊ दिवस भाविक मोठ्या भक्तिभावाने उपवास करतात. उपवासाच्या पदार्थांना मागणी कायम असते. त्या पार्श्वभूमीवर बाजारात शेंगदाणे, साबुदाणा, भगरीची आवक मोठ्या प्रमाणात होते; मात्र यंदा साबुदाण्याचे दर स्थिर असून, शेंगदाणा आणि भगरीचे भाव किलोमागे चार ते सात रुपयांनी वाढले आहेत.
दरम्यान, सध्या नवरात्री सुरू आहे. या निमित्त भाविक नऊ दिवस उपवास करतात. उपवासाच्या काळात ही दरवाढ झाल्याने भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत उपवासाच्या पदार्थाचे दर वाढल्याने सामान्य नागरिकांना उपवास करणेही महागात पडणार आहे. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवातील उपवास आता सामान्यांच्या खिशाला भुर्दंड पाडणारा आहे. तरीसुद्धा भाविक उपवास करून नवरात्रोत्सव साजरा करणारच आहेत.