27.5 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeअंतरराष्ट्रीयभूकंपामुळे इंडोनेशिया हादरले

भूकंपामुळे इंडोनेशिया हादरले

तलाउड : इंडोनेशियाच्या तलाउड बेटांवर मंगळवारी (९जानेवारी) ६.७ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्ठाखाली ८० किमी खोलीवर होता. भारतीय वेळेनुसार रात्री २.१८ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने सोशल मीडिया साइट एक्स वर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून ८० किमी खाली होता. भूकंपाचे हे धक्के इंडोनेशियातील तलाउड बेटावर जाणवले. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेने सांगितले की, गेल्या आठवड्यात गुरुवारी इंडोनेशियातील बलाई पुंगुट येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR