टोकीयो : जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता ६.६ रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली आहे. जपानमधील क्युशू येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचे ईएमएससीने म्हटले आहे. भूकंपाची खोली ३७ किलोमीटर होती. सोमवारी जपानच्या क्युशू प्रदेशात ६.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे वृत्त युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरच्या हवाल्याने दिले आहे.
आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान, दुखापत किंवा जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी, ओक्लाहोमा येथील पाद्री ब्रँडन डेल बिग्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न होण्यासंदर्भात भविष्यवाणी केली होती. ही भविष्यवाणी अक्षरश: खरी ठरली. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी ट्रम्प एका ठिकाणी भाषण देत असताना, एका गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली गेली होती. आता त्याच पाद्रीने आणखी एक मोठी भविष्यवाणी केली आहे, जी कुणाचाही थरकाप उडवेल. मेट्रोने दिलेल्या वृत्तानुसार, क्लेरिक बिग्स यांनी आता पृथ्वीवरील प्रलयासंदर्भात इशारा दिला आहे.
मोठ्या भूकंपाचे संकेत?
ब्रँडन डेल बिग्स यांनी म्हटले आहे की, परमेश्वराने त्यांना १० रिश्टर स्केलच्या भूकंपाचे एक दृश्य दाखवले आहे. जे संपूर्ण अमेरिकेत हजारो लोकांचा बळू घेऊ शकते. त्यांनी दावा केला आहे की, न्यू मॅड्रिड फॉल्ट लाइन हे या भूकंपाचे केंद्र असेल आणि तो मिसुरी, अर्कांसस, टेनेसी, केंटकी आणि इलिनोइसपर्यंत पसरलेल. यात हजारो लोकांचा मृत्यू होईल. सर्व घरे एका झटक्यात कोसळतील. एवढेच नाही तर, हा भूकंप एवढा तीव्र असेल की, जेव्हा त्याचा धक्का मिसिसिपी नदीला बसेल, तेव्हा तिची दिशा बदलेल असे भाकितही त्यांनी केले.