21.3 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeराष्ट्रीयअभिनेत्री खा. कंगना राणावतची फजिती

अभिनेत्री खा. कंगना राणावतची फजिती

वादग्रस्त विधान, भाजपने हात झटकले, कंगना यांना बोलण्याचा अधिकारच नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अभिनेत्री कंगना राणावत पहिल्यांदाच संसदेत खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. भाजपच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशमधील त्यांचे वास्तव्य असणा-या मंडी लोकसभा मतदारसंघातून त्या यंदाची लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांवर परखड शब्दांत टीका सुरू केली. काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या सीमारेषेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाबाबत कंगना राणावतने नुकतीच टीका करणारी भूमिका मांडली होती. त्याचे प्रतिकूल पडसाद उमटल्यानंतर भाजपने कंगना राणावत यांना पक्षाच्या धोरणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी यापुढे अशी वक्तव्ये करू नये, अशा शब्दांत फटकारले. त्यामुळे राणावत यांची फटफजिती झाली.

खा. कंगना राणावत यांनी दिलेल्या मुलाखतीत शेतकरी आंदोलनासंदर्भात विधान केले होते. शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरे झाले केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले अन्यथा तिथे मोठे षडयंत्र रचले जात होते. ते लोक काहीही करू शकले असते, असे राणावत म्हणाल्या होत्या. शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसते तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगला देश सारखी परिस्थिती निर्माण केली असती. त्यासाठी मोठी योजना तयार होती. शेतकरी आंदोलनाच्या नावावर जे काही सुरू होते, ते सर्वांनी बघितले आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलकांना धक्का बसला होता, अशी टीकाही त्यांनी केली होती.

दरम्यान, कंगना रणावत यांनी केलेल्या विधानावरून पक्षावर व्यापक स्तरावर टीका होऊ लागली. त्यानंतर भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. कंगना रणावत यांच्या या विधानाशी पक्षाने असहमती दर्शवली. कंगना रणौत यांना पक्षाच्या धोरणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा अधिकारही नाही, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. ‘मंडीतील भाजपाच्या खासदार कंगना रणावत यांना यापुढे अशी विधाने न करण्याचे निर्देश देण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR