21 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeराष्ट्रीय'ईसीएलएसएस' आता भारतातच विकसित होणार

‘ईसीएलएसएस’ आता भारतातच विकसित होणार

बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने (इस्रो) ‘गगनयान’ मोहिमेसाठी पर्यावरण नियंत्रण आणि जीवन समर्थन प्रणाली (ईसीएलएसएस) भारतातच विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतराळ संस्थेचे प्रमुख एस सोमनाथ यांनी बुधवारी ही माहिती दिली. सोमनाथ म्हणाले की, आम्हाला पर्यावरण नियंत्रण जीवन समर्थन प्रणाली विकसित करण्याचा कोणताही अनुभव नाही. आम्ही फक्त रॉकेट आणि उपग्रहांची रचना करत होतो. हे ज्ञान इतर देशांतून येईल असे आम्हाला वाटले. पण, दुर्दैवाने इतक्या चर्चेनंतरही ते (ईसीएलएसएस) आम्हाला द्यायला कोणी तयार नाही.

गगनयान प्रकल्पात मानवी दलाला चारशे किलोमीटरच्या कक्षेत प्रक्षेपित करणे आणि नंतर त्यांना भारतीय पाण्यात (समुद्रात) उतरवून सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणे. हे याचे उद्दिष्ट आहे. हे मिशन २०२५ मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. सोमनाथ म्हणाले की, इस्रोने आता ईसीएलएसएस स्वदेशी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा आणि आमच्याकडे असलेल्या उद्योगांचा वापर करून आम्ही ते भारतात विकसित करणार आहोत. जेंव्हा आम्ही आमच्या गगनयान कार्यक्रमाद्वारे मानवांना अंतराळात पाठवत आहोत, तेव्हा मला वाटते की आमच्याकडे असलेले कौशल्य आणि आत्मविश्वास सध्याच्या तुलनेत जास्त असायला हवा.

सोमनाथ म्हणाले की, आज संपूर्ण इस्रोमध्ये राष्ट्रीय प्रयोगशाळांच्या सहकार्याने आत्मविश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गगनयान कार्यक्रमाचा पहिला भाग म्हणजे रॉकेट. जेंव्हा रॉकेट प्रक्षेपणासाठी तयार होते, तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, कारण रॉकेट सर्व प्रक्रियांचे पालन करून अतिशय सुरक्षितपणे तयार केले असले तरीही काहीतरी चूक होऊ शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR