23.3 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यातील कंपनीवर ईडीची कारवाई, कोट्यवधींची मालमत्ता जप्त

पुण्यातील कंपनीवर ईडीची कारवाई, कोट्यवधींची मालमत्ता जप्त

पुणे : मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची १२५ कोटींमध्ये फसवणूक करणा-या पुण्यातील विनोद खुटेवर कारवाई झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीजची मालमत्ता जप्त केली आहे

. ईडीने विनोद खुटे यांची ३८ कोटी ५० लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने पुणे, मुंबई आणि अहमदाबादमध्ये छापेमारी करत बँकेतील २३ कोटींची रक्कम सुद्धा गोठवली आहे. खुटे याने काना कॅपिटलच्या ब्रोकरेजमध्ये विविध गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपयांचा निधी गोळा केल्याचा आरोप तपास एजन्सीने केला आहे. खुटे फसवणूक करून दुबईत फरार झाला आहे. दुबईत त्याचे अनेक फ्लॅट्स असल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीने काही महिन्यांपूर्वी विनोद खुटे याच्या कंपनीच्या पुणे आणि अहमदनगर येथील कार्यालयाची झडती घेतली होती. त्यावेळी त्या कंपनीची १८.५४ कोटी रुपयांची बँकेतील रक्कम गोठवली होती. विनोद कुटे याचा श्कढर ग्रुप ऑफ कंपनीजकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवहार झाले. त्यात क्रिप्टो एक्स्चेंजसह वॉलेट सेवांचाही समावेश आहे. तसेच हवालाद्वारे तो परदेशात पैसे पाठवतो. तसेच तो ई-कॉमर्स शॉपिंग पोर्टलद्वारे उत्पादने विकतो. यामुळे ईडीचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि कारवाईला सुरुवात झाली.

पुणे शहरात विनोद खुटे याने धनश्री मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी तयार केली. त्याने गुंतवणूकदारांना चांगल्या व्याजाचे आमिष दाखवले. इतर ठिकाणी मिळत असलेल्या व्याजापेक्षा जास्त व्याज दिले. यामुळे असंख्य गुंतवणूकदारांनी त्याच्या पतपेढीत मोठी गुंतवणूक केली.
ही गुंतवणूक त्याने हवाला चॅनेल आणि शेल कंपन्यांद्वारे देशाबाहेर पाठवली. या प्रकरणात विनोद तुकाराम खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बदाधे आणि अन्य काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR