29 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeराष्ट्रीयतेजस्वी यादव यांना पुन्हा ईडीचे समन्स

तेजस्वी यादव यांना पुन्हा ईडीचे समन्स

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना पुन्हा एकदा समन्स पाठवले आहे. ईडीने आपल्या समन्समध्ये म्हटले आहे की, तेजस्वी यादव यांना पुढील महिन्याच्या ५ तारखेला चौकशीसाठी यावे लागेल. लँड फॉर जॉब प्रकरणात ईडीने तेजस्वी यादव यांना समन्स पाठवले आहे. त्याचवेळी, लालू यादव यांना पुढील आठवड्यात म्हणजे २७ डिसेंबर रोजी त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

या प्रकरणी ईडीने यावर्षी ११ एप्रिल रोजी तेजस्वीची सुमारे ८ तास चौकशी केली होती, परंतु ईडीने लालू यादव यांना तपासात सहभागी होण्यासाठी बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे. लालू प्रसाद कुटुंबीयांचे निकटवर्तीय अमित कात्याल यांची चौकशी केल्यानंतर हे समन्स पाठवण्यात आले आहे. त्यांना ईडीने नोव्हेंबरमध्ये अटक केली होती.

काही महिन्यांपूर्वी या प्रकरणी आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने त्याची दखल घेतली. बिहारचे डेप्युटी सीएम तेजस्वी यादव यांना कोर्टाने समन्स बजावले होते. यासोबतच राऊस एव्हेन्यू कोर्टाने माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनाही समन्स बजावले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR