22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयभगतसिंग छात्र एकता मंचचा निवडणुकीवर बहिष्कार

भगतसिंग छात्र एकता मंचचा निवडणुकीवर बहिष्कार

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठात अनेक ठिकाणी भिंतींवर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे नारे लिहिलेले आढळल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दोन एफआयआर नोंदवले आहेत. पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घोषणांची जबाबदारी भगतसिंग छात्र एकता मंचने (बीएससीईएम) घेतली आहे. बीएससीईएमने लिहिलेल्या घोषणांमध्ये निवडणुकीवर बहिष्कार टाका आणि नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. गुरुवारी सकाळी गस्तीदरम्यान पोलिसांना विद्यापीठ परिसरातील भंतीवर या घोषणा दिसून आल्या होत्या.

लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत आतापर्यंत ५ टप्प्यांतील मतदान संपले असून, सहाव्या टप्प्यासाठी २५ मे रोजी देशातील ५७ मतदारसंघांत मतदान होणार आहे, यामध्ये दिल्लीतील सात मतदारसंघांतही मतदान होणार आहे. मात्र मतदानाच्या आधी दिल्लीतील विद्यापीठाच्या भिंतीवर वादग्रस्त घोषणा लिहिण्यात आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या वादग्रस्त घोषणांमध्ये निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन स्वयंघोषित युवा संघटनेकडून करण्यात आले असून, या संघटनेने आपल्या इन्स्टाग्राम पेजवरही या घोषणांची छायाचित्रे पोस्ट केली आहेत.

दिल्ली पोलिस उपायुक्त (उत्तर) मनोज कुमार मीना म्हणाले की, काही खोडकर घटकांनी दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या भिंतीवर आक्षेपार्ह घोषणा लिहिल्या असून, आरोपींनी स्प्रे पेंटचा वापर करून या घोषणा लिहिल्या आहेत. या प्रकरणात, बदनामी कायद्यांतर्गत दोन एफआयआर नोंदवण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत, असे मनोज कुमार यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR