सोलापूर : पंढरपूर विभागातील पंढरपूर माढा करमाळा माळशिरस मंगळवेढा सांगोला तालुक्यातील रयत क्रांती संघटना व रयत क्रांती पक्षाच्या वतीने पदाधिका-यांचे निवडी करण्यात आल्या. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा न्याय प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून समन्वय समितीच्या नियुक्त करण्यात आल्या यावेळी रयत क्रांती संघटनेचे पंढरपूर विभाग प्रमुख नंदकुमार व्यवहारे उपाध्यक्ष शंकर कवडे पंढरपूर विभाग युवा अध्यक्ष रुपेश वाघ युवा उपाध्यक्ष राहुल पवार रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बोबडे तसेच माढा तालुका काही पदाधिकारी निवडी करण्यात आल्या.
या बैठकीच्या निमित्ताने येणा-या निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून रयत क्रांती संघटनेच्या वतीने ठराव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राज्य प्रवक्ते प्राध्यापक सुहास पाटील पश्चिम महाराष्ट्र ओबीसी सेलचे अध्यक्ष हनुमंत गिरी, छगन पवार, सुनील पाटील, नेताजी नागणे, नागेश गायकवाड जिल्हा संघटक बळीराम गायकवाड असे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.