28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयनिवडणुकीची चाहूल, गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर!

निवडणुकीची चाहूल, गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर!

रोहतक : डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर आला आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजता तुरुंगातून त्याची सुटका झाली. यावेळी राम रहीमला २१ दिवसांची रजा मिळाली आहे. राम रहीम रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. कडेकोट बंदोबस्तात त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यात आले. याआधीही त्याला अनेक वेळा तुरुंगातून रजा मिळाली आहे. डेरा प्रमुख राम रहीम बलात्कार आणि हत्या प्रकरणात तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरमीत राम रहीम सिंगचा १५ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील बागपत येथील बरनावा आश्रमात वाढदिवस साजरा करणार आहेत. यासाठी अनेक अनुयायी उपस्थित राहणार आहेत. वाढदिवसासाठी २१ दिवसांची सुट्टी घेऊन तो बाहेर आला आहे. यानंतर १९ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी तो आपल्या अनुयायांसह बागपत डेरामध्ये उपस्थित राहणार आहेत. गुरमीत सिंगचे अनुयायी दरवर्षी तुरुंगातच राखी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. मात्र यावेळी तो वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर आला आहे. यावेळी गुरमीत राम रहीम बागपत येथील बर्नवा आश्रमात राहणार आहे. २०२४ मध्ये गुरमीत राम रहीम दुस-यांदा बाहेर आला.

गुरमीत सिंगला सुनारिया तुरुंगातून आश्रमात नेण्यासाठी त्याची दत्तकमुलगी हनीप्रीत आली होती. तिच्या सोबत अनेक वाहनांचा ताफा होता. मात्र एकच वाहन राम रहीमला नेण्यासाठी कारागृह संकुलाच्या पार्किंगमध्ये पोहोचले होते. गुरमीत सिंग तुरुंगातून बाहेर येताच उत्तर प्रदेशला निघाला. त्यानंतर त्याचा ताफा पोलिस संरक्षणात बाहेर काढण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान गुरमीत राम रहीम सिंगने २०२४ मध्ये सुटीची मागणी केली होती. राम रहीमने २१ दिवसांच्या रजेसाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर त्याची रजा मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान याआधीही त्याने अशी रजा घेतली आहे. यामुळे तो अनेक वेळा चर्चेत देखील आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR