22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयराज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर

राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणुक वेळापत्रक जाहीर केले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, १९ जानेवारीला दिल्लीतील तीन आणि सिक्कीममधील एका राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, २ जानेवारीला अधिसूचना जारी झाल्यानंतर नामांकन प्रक्रिया सुरू होईल. उमेदवार ९ जानेवारीपर्यंत अर्ज भरू शकतात. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

राज्यसभेच्या चार खासदारांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२३ पर्यंत संपत आहे. आम आदमी पार्टीचे संजय सिंह, सुशील कुमार गुप्ता आणि नारायण दास गुप्ता यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ पुढील वर्षी २७ जानेवारीला संपत आहे. याशिवाय, हिशे लाचुंगपा (सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट) यांचा कार्यकाळ पुढील वर्षी २३ फेब्रुवारी रोजी संपत आहे. संजय सिंग हे २४ जुलैपासून निलंबित आहेत. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह न्यायालयीन कोठडीत आहेत. सभागृहातील बेशिस्त वर्तनामुळे २४ जुलैपासून ते राज्यसभेतून निलंबित आहेत.

यावेळीही आपचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे. या वेळीही दिल्लीतील राज्यसभेच्या तिन्ही जागांवर आम आदमी पार्टीचा (आप) विजय निश्चित मानला जात आहे. वास्तविक, दिल्ली विधानसभेत ७० जागा आहेत आणि त्यापैकी ६२ जागा आपकडे आहेत तर भारतीय जनता पक्षाकडे ८ जागा आहेत. आपकडे येथे प्रचंड बहुमत आहे. मोठे अपसेट न झाल्यास यावेळीही या तीन जागांवर आप विजयी होऊ शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR