नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल वाहनांच्या तुलनेत महागडी असणारी ईलेक्ट्रीक वाहने स्वस्त होणार आहेत. अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पात या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. ईलेक्ट्रीक वाहनांमधील महागडी असलेली बॅटरीच स्वस्त करण्यात येत आहे.
इलेक्ट्रीक वाहनांमध्ये लिथिअम आयन बॅटरी वापरली जाते. बॅटरी नसलेल्या वाहनाची किंमत जेवढी त्याहून अधिक या बॅटरीची किंमत असते. सीतारामण यांनी या बॅटरीमध्ये वापरल्या जाणा-या घटकांवरील कर कमी करण्याची घोषणा केली आहे. कोबाल्ट हा महागडा पदार्थ देखील स्वस्त केला जाणार आहे. यामुळे लिथिअम आयनच्या बॅटरीची किंमतही कमी होणार आहे. या घोषणेमुळे केवळ इलेक्ट्रीक वाहनेच नाही तर मोबाईलही स्वस्त होणार आहेत. ईलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमती कमी होणार आहेत. याचा फायदा नव्याने ईव्ही घेणा-यांना होणार आहे. तसेच ज्या लोकांनी ईव्ही घेतल्या आहेत, त्यांची बॅटरी खराब झाली तरीही त्यांना नवी बॅटरी बदलताना याचा फायदा मिळणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष (डायरेक्ट) आणि अप्रत्यक्ष कर ( इन-डायरेक्ट टॅक्स) मध्ये बदल करण्याची घोषणा केली. त्यामुळे काही उत्पादनं स्वस्त होतील. तसंच नवीन करवाढीमुळे इतर उत्पादनांच्या किमती वाढू शकतात. मुख्यत्वे कॅन्सर, ईव्ही या गोष्टींवरील कर कमी करण्यात आला आहे.