अहमदपूर: शहरातील शिवाजी चौक परिसरातील सराफा रस्त्यावर असलेल्या पत्राच्या दुकानास रविवार (ता. सात ) पहाटे चारच्या दरम्यान अचानक आग लागली या आगीमध्ये 11 दुकाने जळून खाक झाले आहेत.यामध्ये स्वीट मार्ट, किराणा, दातांचा दवाखाना, प्लास्टिक पाईप, सौंदर्य प्रसाधने अशा दुकानांचा समावेश आहे.
पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटास अग्निशामन दलाची गाडी बोलवण्यात आली त्यानुसार अहमदपूर शहरातील अग्निशामन दलाचे कर्मचारी कैलास सोनकांबळे, प्रकाश जाधव, प्रशांत गायकवाड, अजित लाळे हे घटनास्थळी दाखल झाले तर नंतर उदगीर, चाकूर, लोहा या ठिकाणाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उपस्थित होती.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन तासाचे अथक प्रयत्न करावे लागले. आग विझवत असताना कैलास सोनकांबळे व राहुल गायकवाड यांच्या हताला भाजल आहे