जालना : विशेष प्रतिनिधी
प्रस्थापित राजकारण्यांनी सातत्याने मुस्लिम, मराठा, दलित घटकांना योग्य सामाजिक प्रतिनिधीत्व नाकारल्यामुळे किंबहुना हे राजकीय ‘नकोसे’पणा अस झाल्यामुळे मी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे वक्फ बोर्डचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे मविआ आणि महायुतीकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये न पाहिलेल्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळतील असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याच्या शेवटच्या दिवशी जरांगे पाटील यांनी विविध धर्मगुरुंसोबत बैठक घेतली आणि यामध्ये कोणाला ज्ािंकवायचं आणि कोणाला पाडायचं यावर चर्चा करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान वक्फ बोर्डाचे प्रवक्ते असलेले सज्जाद नोमानी यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
मुस्लिमांसह बौद्ध, मराठा, एससी-एसटी समाजाच्या उमेदवारांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला जात असताना नोमानी यांनी मविआच्या नेत्यांना २५ मतदारसंघाची यादी पाठवली आहे. या मतदारसंघामध्ये मुस्लिमांची संख्या जास्त असल्याने मुस्लीम उमेदवारांची ज्ािंकण्याची शक्यता जास्त असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
नोमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही त्यांना मत द्यायचे आणि ते आमचे उमेदवार देणारच नाही असे किती दिवस चालायचे? दुसरे पर्यायही उभे राहत आहेत. सगळ्या समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्या, लोकसंख्येच्या हिशोबाने तिकीटे द्या, असं म्हणत जरांगे पाटलांना पाठिंबा असल्याचं सूचित केलं. भायखळ्यात ४१.५ टक्के मुस्लीम, अकोला पश्चिम ४१.६ टक्के मुस्लीम, औरंगाबादमध्ये ३८.५ टक्के मुस्लीम, औरंगाबाद पूर्वेला ३७.५ टक्के तर वांद्रे पश्चिम येथे ३८ टक्के मुस्लिमांची संख्या आहे. त्यामुळे या भागात मुस्लीम उमेदवार उभा केल्यास जिंकण्याचा अंदाज आहे.