सोलापूर : भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर येथे नुकतेच कौशल्य विकास व आजचा युवक या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाला प्रमुख वक्ते म्हणून इन्स्टिटयूूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया न्यू दिल्लीच्या डेप्युटी डायरेक्टर डॉ. सपना मल्होत्रा या लाभल्या. कार्यक्रमाच्या परिसंवादाच्या सुरुवातीला इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी डॉ. सपना मल्होत्रा यांचे स्वागत केले व आपल्या स्वागत पर भाषणामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यातर्फे कौशल्य विकासाच्या विविध योजना या उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी त्याचे लाभ घेणे गरजेचे असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी भारती विद्यापीठातर्फे राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली.
डॉ. सपना मल्होत्रा यांनी आपल्या भाषणामध्ये भारतामध्ये कौशल्याची कमतरता नाही परंतु आपल्याला कोणते कौशल्य आवश्यक आहे हा प्रश्न नेहमीच युवकांना भेडसावतो व यासाठी कौशल्य विकास शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कौशल्याचे एकूण तीन प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले यामध्ये संज्ञात्मक कौशल्य तांत्रिक कौशल्य व परस्पर कौशल्य यांचा समावेश होतो. भारत हा युवकांचा देश म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. भारतातील ६५ टक्के जनता ही कार्यक्षम असून इतर देशांच्या मानाने ही संख्या फार मोठी आहे. परंतु या युवकांना केंद्र सरकारतर्फे कौशल्य विकासाच्या उपलब्ध असलेला योजनांविषयी माहिती होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालया तर्फे युवकांसाठी विविध योजना राबविल्या जातात यातली मुख्यत्वे करून प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना युवकांसाठी लाभदायक आहे. राज्य सरकार तर्फे ही कौशल्य विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात व युवकांनी याचा फायदा करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. भाषणाच्या शेवटी डॉ. सपना मल्होत्रा यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्लेसमेंट कोऑर्डिटर डॉ. शबनम माने यांनी केले. यावेळी एमबीए विभाग प्रमुख प्रा. सी. आर. सूर्यवंशी, एमसीए विभाग प्रमुख डॉ. एम. के. पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.