38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेचे इंजिन बाजुला?

मनसेचे इंजिन बाजुला?

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे महायुतीत येणार अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिल्लीतील अमित शाह भेटीनंतर या चर्चांना जोर आला. त्यानंतर मुंबईत राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचीही भेट झाली. त्यामुळे मनसे महायुतीत येणार हे जवळपास निश्चित मानले गेले. परंतु आता मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत नवीन माहिती समोर येत आहे.

मनसेने महायुतीत यावं यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू होते. त्यादृष्टीने हालचालीही सुरू झाल्या. परंतु मनसेने महायुतीतील एका चिन्हावर लढावे असा प्रस्ताव देण्यात आला. हा प्रस्ताव राज ठाकरेंनी फेटाळला. त्यानंतर मनसेने लोकसभा निवडणूक न लढता महायुतीला पाठिंबा द्यावा. त्या बदल्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागा घ्याव्यात असे पुढे आले. मात्र राज ठाकरेंनी या प्रस्तावालाही नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. मनसेसोबत चर्चा सुरू होत्या परंतु वाटाघाटी होत नसल्याने सध्या तरी कुठलाही निर्णय नाही अशी स्थिती आली आहे.

मनसेने भाजपा किंवा शिवसेनेच्या चिन्हावर लढावे असा प्रस्ताव होता. त्याला मनसेने नकार दिला. मनसे स्वत:च्या रेल्वे इंजिन या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहे. राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीसांमध्ये भेटी झाल्या. त्यानंतर राज ठाकरेंनी अमित शाहांची भेट घेतली. या भेटीत मनसेला त्यांच्या चिन्हावर लढण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला. मनसेने ३ जागांची मागणी केली. चर्चेत २ जागांवर बोलणी झाली.

त्यातील एका जागेवर दोन्ही पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतली. मात्र मनसेने आपल्याच चिन्हावर लढावे अशी अट पुन्हा पुढे करण्यात आली. त्यामुळे मनसेसोबतच्या चर्चा थंडावल्या आहेत. दरम्यान, मुंबईतील दक्षिण मुंबई ही जागा मनसेला महायुतीत मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. याठिकाणी सध्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच महाविकास आघाडीने रिंगणात उतरवले आहे. तर या मतदारसंघात मनसेची ताकद पाहता ही जागा मनसेला देण्यासाठी महायुती सकारात्मक आहे. पण मनसेने कमळ किंवा धनुष्यबाण चिन्हावर लढावे अशी अट आहे. परंतु मनसेचा त्यासाठी नकार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आगामी काळात मनसे युतीवर काय तोडगा निघतो हे पाहणे गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR