22 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeराष्ट्रीयमक्यापासून इथेनॉल निर्मितीला बळ

मक्यापासून इथेनॉल निर्मितीला बळ

उत्पादनवाढीसाठी आयसीएआरवर जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपायोजना करताना दिसत आहे. कारण इंधनाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होत आहे. त्यामुळे सरकार देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे उत्पादन देशात वाढविण्यावर भर देत आहे. इथेनॉलमुळे आता शेतकरी ऊर्जा प्रदाता म्हणून ओळखले जाऊ लागला आहे. यासाठी सरकार मक्यापासून इथेनॉल बनवण्यावर भर देत आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात मका उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. याची जबाबदारी आयसीएआर अंतर्गत भारतीय मका संशोधन संस्थेला (आयआयएमआर) दिली आहे.

भारतात आतापर्यंत पेट्रोलमध्ये १२ टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. २०२५ पर्यंत ते २० टक्क्यांवर नेले पाहिजे. त्यामुळे केवळ उसापासूनच नव्हे तर तांदूळ आणि मक्यापासून इथेनॉल बनविण्यावर सरकार भर देत आहे. ऊस आणि भात पिकामध्ये जास्त पाणी वापरले जाते तर मक्याच्या लागवडीत कमी पाणी वापरले जाते. त्यामुळेच सरकार मक्यापासून इथेनॉल बनवण्यावर भर देत आहे. म्हणूनच इथेनॉल उद्योगांच्या पाणलोट क्षेत्रात मका उत्पादन वाढवणे नावाचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ज्याची जबाबदारी आयसीएआर अंतर्गत भारतीय मका संशोधन संस्थेला देण्यात आली आहे. त्याअंतर्गत मक्याचे उत्पादन वाढविण्यात येत आहे.

इथेनॉलसाठी मक्याचे उत्पादन वाढवण्याच्या या मोहिमेत एफपीओ, शेतकरी, डिस्टिलरी आणि बियाणे उद्योग यांना एकत्र घेऊन काम केले जात आहे. त्याअंतर्गत शेतक-यांना जास्त उत्पादन देणा-या वाणांचे बियाणे वाटप करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत खरीप आणि रबी हंगामात १५०८ एकरांवर मका पेरणी करून शेतक-यांना त्याची लागवड वाढविण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे.

खरीप हंगामात ७८८ एकर क्षेत्रात लागवड
मका लागवडीचे फायदे शेतक-यांना सांगणे आणि इथेनॉलचे उत्पादन वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. सद्यस्थितीत मका लागवडीमुळे शेतक-यांना निश्चितच चांगला नफा मिळेल. या प्रकल्पांतर्गत खरीप हंगामात ७८८ एकर क्षेत्रात मक्याची लागवड करण्यात आली. ज्यामध्ये डेमोची संख्या ८०८ होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR