22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeसोलापूरउद्योजकांनी आंतरराष्ट्रीय गारमेंट बाजारपेठांमध्ये उतरावे

उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय गारमेंट बाजारपेठांमध्ये उतरावे

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन आठव्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरचा बंगळूरु येथे शुभारंभ

सोलापूर : सोलापूरच्या गारमेंट उद्योजकांमध्ये एकी आहे. याच एकीच्या बळावर देशातील बाजारपेठांसोबत आंतरराष्ट्रीय गारमेंट बाजारपेठांमध्येही सोलापूरच्या उद्योजकांनी उतरावेत. त्यांची ती क्षमता आहे. गुणवत्ता, विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीच्या आधारावर निश्चितच आंतरराष्ट्रीय गारमेंट बाजारपेठांमध्ये सोलापूरकर छाप पाडतील असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला आहे.

सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या वतीने आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरचे बंगळूरू येथे थाटात उद्घाटन झाले. बंगळूरूयेथील शृंगार पॅलेस ग्राउंडवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते तीन दिवसीय फेअरचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार सुभाष देशमुख, रिलायन्स कंपनीच्या कंज्यूमर विभागाचे सहाय्यक उपाध्यक्ष शरद कुमार, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा, फेअर कमिटीचे अध्यक्ष सुनील मेंगजी, सचिव व्यंकटेश मेंगजी आदी उपस्थित होते. असोसिएशनचे संचालक अमित जैन यांनी सूत्रसंचालन तर प्रकाश पवार यांनी आभार मानले. या फेअर मध्ये १०४ गारमेंट कंपन्यांचे स्टॉल असून यात १२० युनिफॉर्म ब्रँड तसेच बारा हजाराहून अधिक डिझाइन्सचा समावेश आहे.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, त्रिपुरा येथील गारमेंट उद्योजकांनी मार्केटिंग कौशल्याच्या आधारे डोमेस्टिक मार्केटसोबत आंतरराष्ट्रीय मार्केटम ध्ये आपली एक वेगळी छाप पाडली. त्रिपुराच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील गारमेंट उद्योजकही तशी प्रगती करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात सोलापूरच्या गारमेंट उत्पादनाबद्दल आवर्जून उल्लेख करतात. हे येथील उद्योजकांचे यश आहे. सोलापुरात तयार होणारे युनिफॉर्म हे युनिव्हर्सल आहे. त्यामुळे युनिफॉर्म क्षेत्रातील त्यांची क्षमता त्यांनी देशाच्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर सादर करणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यात त्यांना संरक्षण विभागातील विविध युनिफॉर्मचे ऑर्डर्स मिळू शकतात.

गारमेंट उद्योगात सक्रिय उद्योजकांनी उलाढालीची चिंता न करता त्यांनी मार्केटिंग कौशल्य शिकून निर्यात करण्याचे धाडस केले पाहिजे. सुभाष देशमुख म्हणाले २०१६ साली गारमेंट उद्योजकांनी माझी भेट घेतली होती. उद्योग अडचणीत असल्याची माहिती दिली. गारमेंट उद्योगातील कामगारही स्थलांतरित होत आहेत. कामगारांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती त्यांच्याकडून झाली. यातूनच गारमेंट फेअरची संकल्पना पुढे आली. मागील आठ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअर उत्साहात आयोजिला जात आहे. यास देशासह विदेशातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सोलापूरच्या विडी उद्योगात पूर्वी ९० हजाराहून अधिक महिला काम करायच्या. धूम्रपान विरोधी कायद्यामुळे विडी उद्योगावर गंडांतर आले. त्यामुळे विडी महिला कामगारांची संख्या कमी झाली. अनेक म हिला बेरोजगार झाल्या. सोलापुरातील गारमेंट उद्योगाने विडी महिला कामगारांना आधार दिला. आज गारमेंट उद्योगात असंख्य महिला काम करत आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR