23.3 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeपरभणीपाथरी मतदारसंघातील शेकडो पदाधिका-यांचा शिवसेनेत प्रवेश

पाथरी मतदारसंघातील शेकडो पदाधिका-यांचा शिवसेनेत प्रवेश

पाथरी : पाथरी विधानसभा अंतर्गत येणा-या परभणी तालुक्यातील अनेक गावांतील विविध पक्षातील शेकडो प्रमुख पदाधिका-यांनी दि. २० जुन रोजी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेमधील प्रवेशाचा ओघ हा कायम असून निश्चितच येत्या काळात पाथरी विधानसभेसह परभणीत बदल घडवून सर्वसामान्यांना विकासाच्या माध्यमातून न्याय देणार असल्याची ग्वाही यावेळी शिवसेना नेते सईद खान यांनी दिली.

या प्रवेश सोहळ्याला माजी आ. माणिकराव आंबेगावकर, दादासाहेब टेंगसे, असेफ खान, जिल्हाप्रमुख टाकळकर, चक्रधर उगले, सर्जेराव गिराम, पप्पु घांडगे, संतोष गलबे, हसीब खान, युसोफोद्दीन अन्सारी, विठ्ठल रासवे, एल.आर कदम, खालेद शेख, युनुस कुरेशी, अनवर अन्सारी, राज्यातील सर्व अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक, शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते. आपापल्या गावात राजकीय वजन ठेवणा-या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश शिवसेनेत करून घेण्यात एल.आर कदम आणि खालेद शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दहा हजार दलित बांधवांचा मेळावा घेणार : कदम
पाथरी विधानसभेत शिवसेनेचा आमदार व्हावा ही सर्वच कार्यकर्त्यांची महत्त्वकांक्षा आहे. शिवसेना नेते सईद खान यांनी येत्या विधानसभेत पाथरी तालुक्याचे नेतृत्व करावे यासाठी दहा हजार दलित बांधवांचा मेळावा घेऊन त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी एल.आर कदम यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR