25.3 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रतुम्हाला १ लाख दिले तरी कमी वाटतील...

तुम्हाला १ लाख दिले तरी कमी वाटतील…

मानधन वाढवा म्हणणा-या अंगणवाडी सेविकेला अजित पवारांनी झापले

मुंबई : प्रतिनिधी
१० हजार रुपयांमध्ये काही होत नाही. मानधन वाढवा, असे म्हणणा-या अंगणवाडी सेविकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झापलं आहे. उद्या तुम्हाला १ लाख दिले तरी कमी वाटतील. मानधन वाढवण्यात आले आहे. तुम्ही जे सांगितले ते लक्षात ठेवतो. योग्यवेळी निर्णय घेतो, असं अजित पवार म्हणाले आहेत.

एका कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते. यावेळी अंगणवाडी सेविका देखील उपस्थित होत्या. एक अगणवाडी सेविका उभी राहिली अन् तिने आपली व्यथा मांडली. गेल्या पन्नास वर्षापासून आयसीडीएस योजना आहे. ग्राऊंड लेवलची ही योजना आहे. पण, यासाठी काम करणारी अंगणवाडी सेविका आज खूश नाही, असे अंगणवाडी सेविका म्हणाली.

अंगणवाडी सेविका पुढे म्हणाली की, आमची मागणी आहे की आमच्या मानधनामध्ये वाढ व्हावी. तुम्हाला विचार करता आला तर तुम्ही यावर जरूर विचार करा. कारण १० हजारामध्ये काहीही होत नाही. अजित पवारांनी अंगणवाडी सेविकेच्या या मागणीला उत्तर दिले किंवा एकप्रकारे अंगणवाडी सेविकेला झापले असे म्हणता येईल.

अजित पवार म्हणाले की, ज्या वेळेस योजना आली तेव्हा मी आमदार होता. तेव्हा ६० रुपये महिना मिळत होता. ते वाढवत-वाढवत आम्ही इथंपर्यंत आणले आहे. ही केवळ राज्याची योजना नाही. याला केंद्राचा काही निधी असतो अन् राज्याचा काही निधी असतो. यामध्ये काम फक्त पाच तास असतं. म्हणजे तुम्ही अर्धवेळ काम करता. याचा अर्थ पूर्णवेळेसाठी २० हजार दिल्यासारखे आहे.

तुम्ही असेच म्हणत बसाल तर उद्या तुम्ही म्हणाल की १ लाखाने देखील काही होत नाही. अंगणवाडी सेविका शिजवण्याचं काम करून अर्धवेळ काम करत असते. मी हा विषय टाळतोय असे नाही. मागे आम्ही कोतवालांचे मानधन वाढवले, पोलीस पाटलांचे वाढवले. अंगणवाडी सेविकांचे वाढवले आहे. तुम्ही सांगितलेले आम्ही लक्षात ठेवतो आणि योग्यवेळी याबाबत निर्णय घेतो, असे म्हणत अजित पवारांनी अंगणवाडी सेविकेला चूप केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR