बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील सर्वांच्या परिचयाचे आहेत. आपल्या मागणीवर ठाम असून ते पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. शनिवारी बीडमध्ये इशारा सभा पार पडली. या सभेतून त्यांनी मराठा आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली. त्यांनी मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून मुंबईत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच जरांगे यांचा क्रिकेटच्या मैदानात वेगळा अंदाज दिसून आला.
जरांगे पाटील मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसले. यावेळी त्यांनी बॅटिंग, बॉलिंग देखील केली. जरांगे पाटील यांची चांगले क्रिकेटपटू म्हणून देखील ओळख आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मराठी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यामुळे त्यांना क्रिकेट खेळायला वेळ मिळाला नाही. आंदोलन, उपोषण, दौरे, सभा यामध्ये ते व्यस्त होते.
मैदानावर हातात बॅट घेत अंतरवाली सराटी येथील आपल्या मित्र कंपनीसोबत त्यांनी क्रिकेटचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी बॅटिंग, बॉलिंग देखील केली. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला होता. ती डेडलाईन आज संपत आहे, या पार्श्वभूमीवर काल मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये इशारा सभा घेतली.