23.3 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeसोलापूरमोबाईलच्या जमान्यातही अजित फाऊंडेशनमधील मुलांचा मित्र बनले वर्तमानपत्र

मोबाईलच्या जमान्यातही अजित फाऊंडेशनमधील मुलांचा मित्र बनले वर्तमानपत्र

बार्शी : गोष्टीच्या पुस्तकांसोबतच वर्तमानपत्रांमध्ये वैविध्यपूर्ण बातम्या वाचून नवंनव्या गोष्टींची माहिती मिळवत स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र वाचणे फार उपयोगी आहे, असं पालक आपल्याला लहानपणी सांगायचे. मात्र आताच्या मोबाईलच्या जमान्यात मुलांनी वर्तमानपत्र वाचन ही गोष्ट दुर्मिळच. पण बार्शीतील अजित फाऊंडेशनमधील मुले मात्र याला अपवाद ठरली आहेत. अजित फाऊंडेशनमधील मुलांच वर्तमानपत्र मित्र बनले आहे.

येथील मुलांना वर्तमान पत्रं हाताळणे सोपे जाते. राजकारण, खेळ, गुन्हे, अर्थकारण, विज्ञान(?) अशा विविध क्षेत्रातल्या बातम्या वर्तमानपत्रातून मिळतात. टॅबलेट, मोबाईल फोन इत्यादी डिजिटल माध्यमातून बातम्या वाचण्यापेक्षा कागदी वर्तमानपत्रातून बातम्या वाचण्याचा वेगळा आनंद आहे. यागोष्टींचा विचार करून अजित फाउंडेशनमधील मुलांसाठी ‘मित्र वर्तमानपत्र’ हा उपक्रम सुरु केला आहे.

यामुळे मुलांचे वाचनाचे गट केले आहेत. रोज प्रत्येक गटाने एक तास सामूहिक वाचन करायचे. त्यात गटातील क्रमनिहाय एका-एक मुलाने पुढे येऊन प्रकट वाचन करायचे. वाचनावेळी नवीन शब्द त्याच गटातील मुलाने फलकावर लिहायचा. वर्तमानपत्र वाचन झाल्यानंतर गटातील मुलं फलकातील सर्व शब्द वहीत लिहून संग्रही करतात. यामुळे मुलांच्या शब्दकोशात नवीन शब्दांची भर पडते व शब्दकोशही तयार होतो. पुढे, मुले फलकावरील लिहीत शब्द क्रमाक्रमाने वाचन करतात व सर्व मुले त्यापाठीमागे म्हणतात. या उपक्रमामुळे मुलांचे वाचन, लेखन व शब्दसंपत्ती समृद्ध होते. वर्तमानपत्र वाचणे ही मुलांमध्ये विकसित होण्याची एक उत्कृष्ट सवय आहे आणि ती लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये रुजवली पाहिजे.

हे सामान्य ज्ञान वाढवून, भाषेचे आकलन मजबूत करून, लेखन आणि वाचन कौशल्ये आणि शब्दसंग्रह वाढवून व्यक्तिमत्त्वाच्या विकासात मदत करते. या सर्व बाबींचा विचार करून अजित फाऊंडेशनमध्ये ‘मित्र वर्तमानपत्र’ उपक्रम कार्यरत आहे. वाचन उपक्रमात संस्थेतील मुले अतिशय आनंदाने सहभागी होत आहेत. या उपक्रमासाठी महेश निंबाळकर, विनया निंबाळकर, राजेश स्वामी, सारिका स्वामी व कमलेश चौधरी परिश्रम घेत आहेत.

अजित फाऊंडेशन मुलांना मित्र वर्तमानपत्र उपक्रमामुळे वाचनाची आवड निर्माण झाली आहे. याशिवाय वाचन, नवीन शब्दांची ओळख, समृद्ध शब्दसंपत्ती यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आहे. मोबालईच्या अतिवापरात वाचन कमी होत असताना ‘मित्र वर्तमानपत्र हा उपक्रम उत्तम पर्याय वाटतो. भविष्यात मुलांना या उपक्रमाचा खूप फायदा होईल. असे अजित फाउंडेशन चे संस्थापक महेश निंबाळकर यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR