26.2 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रतहसील कार्यालयातून ईव्हीएम मशिन चोरीला

तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशिन चोरीला

बारामती : ईव्हीएम मशिन चोरीला गेल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशिनच्या कंट्रोल युनिटची चोरी झाली आहे. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात आलेल्या आहेत.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस (शनिवार आणि रविवार) तहसील कार्यालयास सुटी होती. सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिका-यांना स्ट्राँग रूमचे कुलूप तोडण्यात आलेले आढळून आले.

या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशिनमधून एका ईव्हीएम मशिनचे कंट्रोल युनिट चोरी गेले आहे.. ईव्हीएम मशिनचे कंट्रोल युनिट चोरीला गेले ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. यासंदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR