29 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रगॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट ; चिमुकल्याने गमावला जीव

गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट ; चिमुकल्याने गमावला जीव

नागपूर: नागपूरच्या सदर पोलिस ठाण्यांतर्गत व्हीसीए स्टेडियमजवळ भीषण दुर्घटना घडली आहे. गॅस फुग्याच्या सिलिंडरचा ब्लास्ट होऊन एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ज्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडला. शिझान आसिफ शेख (३.५ वर्षे, रा. न्यू मानकापूर) असे मृत मुलाचे नाव असून अनमत आसिफ शेख (वय २४) आणि फारिया हबीब शेख (वय २८) अशी जखमींची नावे आहेत. तर, आरोपी फुगे विक्रेता सत्येंद्र सिंह घटनास्थळावरून फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा आपल्या पालकांसह सदर परिसरात खरेदीसाठी गेला होता. नाताळच्या निमित्ताने हा चिमुकला आपल्या कुटुंबासह फिरत असताना सदर येथील व्हीसीए स्टेडियमच्या परिसरात पोहोचला. दरम्यान, गॅसचा फुगा विकत असलेली व्यक्ती चर्चसमोर उभी होती. यादरम्यान, अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट होताच सिंिलडर हवेत उंच उडून मुलाच्या डोक्यावर पडला. या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला. तसेच, अन्य दोघे जखमी झाले.

पोलिसांनी आरोपी फुगे विक्रेता विरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघातामुळे नागरिकांनी फुग्याच्या सिलिंडरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासोबतच कुटुंबियांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR