22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रकल्याण रेल्वे स्थानकात स्फोटके

कल्याण रेल्वे स्थानकात स्फोटके

ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकावर बुधवारी तब्बल ५४ डेटोनेटर सापडले. सुदैवानं कुठलाही अनुचित प्रकार घडण्याच्या आतच बॉम्बशोधक पथकाने ही स्फोटकं ताब्यात घेतली. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील सरकत्या जीन्याखाली डेटोनेटरचे बॉक्स ठेवले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळला. मात्र रेल्वे स्थानकात स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे.

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर बुधवारी सकाळी ११.३० वाजता दोन खोक्यांमध्ये भरलेली एकूण ५४ स्फोटके (डिटोनेटर्स) कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. कल्याण पश्चिम फलाट क्रमांक १ वर दोन खोके आहेत, त्यात स्फोटक सदृश्य ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती रेल्वे स्थानकातील एका सफाई कामगाराने कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली. कल्याण लोहमार्ग विभागाचे उपायुक्त मनोज पाटील, कल्याण परिमंडळाचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तातडीने रेल्वे स्थानकात सहका-यांसह येऊन खोक्यांची तपासणी करून ते दोन्ही खोके ताब्यात घेतले.

पोलिसांचा सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
त्यानंतर तातडीने पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाच्या साहाय्याने या खोक्यांची तपासणी करण्यात आली. ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणत्या कारणासाठी आणली होती, ती कोणी आणून ठेवली. स्फोटके रेल्वे स्थानकात आणून ठेवण्याचा उद्देश काय होता, अशा विविध अंगांनी पोलिसांच्या विशेष पथकाने तपास सुरू केला आहे. ही स्फोटके दगड खाणीच्या खदानींमध्ये सुरूंग स्फोटासाठी, विहिरी खोदण्यासाठी वापरली जातात अशा क्षमतेची आहेत. या स्फोटकांचा तातडीने स्फोट होत नाही. ती डिटोनेटर्स जिलेटीन कांड्यांसारखी असतात. त्यांना वात असते. ती स्फोटकांशिवाय स्फोट करत नाहीत. तरीही ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणी आणली याचा तपास सुरू आहे असे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले. ही स्फोटके खरेदी करून एखादा व्यावसायिक कल्याण रेल्वे स्थानकात येऊन लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असावा. त्यावेळी पोलीसकिंवा अन्य हालचालींमुळे त्याने स्फोटकांचे खोके तेथेच ठेऊन पळ काढला असावा, असाही तर्क पोलिसांकडून काढला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR