27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरअरविंद खोपे मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर अ‍ॅट्रॉसिटी कलमाची वाढ

अरविंद खोपे मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर अ‍ॅट्रॉसिटी कलमाची वाढ

लातूर : प्रतिनिधी
माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर हे अध्यक्ष असलेल्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा(जेएसपीएम) संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात इयत्ता ७ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या १३ वर्षीय अरविंद खोपे या विद्यार्थ्याचा संस्थेच्या वस्तीगृहात संशयास्पद मृत्यू प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटी कलमाची वाढ करण्यास टाळाटाळ करणा-या एमआयडीसी पोलिसांना प्रथमवर्ग न्यायालयाने चपराक देत सदरील गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी कलमांची वाढ करण्याचे निर्देश दिले. सदरील प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग केले. यांनतर गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी कलमाची वाढ एमआयडीसी पोलिसांकडून करण्यात आल्यानंतर सायकांळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांनी आरोपीना जिल्हासत्र न्यायालयापुढे हजर करण्यात आल्यानंतर संशयीत आरोपी वस्तीगृह व्यवसथापक विठ्ठल सुर्यवंशी व विनायक टेकाळे यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

जेएसपीएम संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात अरविंद खोपे या अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. २९ जुलैच्या रात्री घडली होती. मुलाचा खुन करण्यात आल्याचा आरोप चिमुकल्या अरविंदचे पालक व नातेवाईकांडून केला जात आहे. तसा आरोप करीत त्याच्या नातलगांनी अरविंदचे प्रेत ताब्यात घेण्यास नकार दर्शविला असता दि. ३१ जुलै रोजी एमआयडीसी पोलिसांनी अरविंदचे मावस काका सहदेव गणपती तरकसे रा. मोतीनगर लातूर यांचा पुरवणी जबाब नोंदवत त्यांना अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे अश्वासन देत तसे लेखी पत्रही दिले होते.

यानंतर मात्र एमआयडीसी पोलिसांकडून सदरील गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटीच्या कलमांची वाढ करण्यास टाळाटाळ केली जात होती. सोमवारी या गुन्ह्यात अरविंदच्या मृत्यूचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केलेल्या वस्तीगृह व्यवसथापक विठ्ठल सुर्यवंशी व विनायक टेकाळे यास २ रे सहन्यायाधिश तथा प्रथम दंडाधिकारी श्रीमती झा यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता फिर्यादी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. प्रतीक कांबळे, अ‍ॅड. रमक जोगदंड, अ‍ॅड. प्रितम कांबळे यांनी अरविंदच्या नातलगांना पोलिसांनी अ‍ॅट्रासिटी कलम वाढवण्यासंदर्भात दिलेले पत्र व जातीचे प्रमाणपत्र सादर करत आपली बाजू मांडली.

यानंतर न्यायाधीश झा यांनी एमआयडीसी पोलिसांना खडेबोल सुनावत सदरील गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी कलमांची वाढ करण्याचे निर्देश देत सदरील प्रकरणा जिल्हासत्र न्यायाधीश त्रिपाठी यांच्याकडे वर्ग केले. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी आरोपीतांना न्यायालयातून परत पोलिस ठाण्यात नेत सदरील गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटीच्या कलमांची वाढ करीत सदरील गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांचेकडे वर्ग केला. यानंतर त्यांनी सायकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संशयीत आरोपी वस्तीगृह व्यवसथापक विठ्ठल सुर्यवंशी व विनायक टेकाळे यास जिल्हासत्र न्यायालयापुढे हजर कले असता न्यायायालयांने दोन्ही बाजूचे म्हणने ऐकूण घेत आरोपीच्या पोलिस कोठढीत एक दिवसाची वाढ केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR