परभणी : प्रवाशांची मागणी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे विभाग हैदराबाद-जयपूर-हैदराबाद आणि काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा या विशेष गाड्या चालवत आहे. या विशेष गाड्यांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या दोन्ही गाड्या आठवड्यातून एक दिवस धावणार आहेत.
गाडी क्रमांक ०७०२० हैदराबाद-जयपूर या विशेष गाडीस दि.३ जानेवारी पासून पुढील आदेशापर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. ही गाडी हैदराबाद येथून दि.३ जानेवारी पासून दर शुक्रवारी रात्री ७.५० वाजता सुटेल आणि सिकंदराबाद, निझामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, उज्जैन, अजमेर मार्गे जयपूर येथे रविवारी सकाळी ५.२५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७०१९ जयपूर-हैदराबाद या गाडीस दि.५ जानेवारी पासून पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी जयपूर येथून दर रविवारी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच र्नेच हैदराबाद येथे मंगळवारी सकाळी ५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७०५३ काचीगुडा-बिकानेर या विशेष गाडीस दि.४ जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी काचीगुडा येथून दि.४ जानेवारीपासून दर शनिवारी रात्री १० वाजता सुटेल आणि मल्काजगिरी, निझामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, भोपाल, कोटा, जयपूर, सिखर, रतनगढ मार्गे बिकानेर येथे सोमवारी दुपारी ३ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७०५४ बिकानेर-काचीगुडा या गाडीस दि.७ जानेवारी पासून पुढील आदेशापर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. ही गाडी बिकानेर येथून दर मंगळवारी १.३० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे गुरुवारी सकाळी पोहोचेल. या दोन लांब पल्लयाच्या गाड्यामुळे प्रवाशांना सुविधा मिळाली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.