21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईत प्रदूषणाची ‘अतिवाईट’ श्रेणी

मुंबईत प्रदूषणाची ‘अतिवाईट’ श्रेणी

मुंबई : प्रतिनिधी
उत्तर भारतात वाढती थंडी आणि प्रदूषणाचा प्रभाव मुंबईत दिसत आहे. दिल्लीसह मध्य भारतात थंडी वाढली आहे. सोबतच प्रदूषणाचा स्तरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्यानंतर प्रदूषणामध्ये पुन्हा वाढ पाहायला मिळत आहे. सोमवारी मुंबईतली हवा ‘मध्यम’ श्रेणीची होती. तर नवी मुंबई, भिवंडी, गोवंडी आणि मालाड भागात हवेची गुणवत्ता अधिक प्रदूषित होती.

मुंबईतील समुद्रा जवळील भागातील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंद करण्यात आली आहे. यामध्ये नेव्ही नगर झ्र कुलाबा भागातील हवा अतिप्रदूषित असल्याची नोंद करण्यात आली आहे. प्रदूषणाचा स्तर वाढल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. सोमवारी मुंबईची हवा गुणवत्ता निर्देशांक १४९ इतका होता. तर आज हवेची गुणवत्ता निर्देशांक १६६ एवढी नोंद करण्यात आली आहे.

नेव्ही नगर, कुलाबा येथे ‘अतिवाईट’ हवेची नोंद आहे. काल हवेची गुणवत्ता निर्देशांकानुसार सायंकाळी ५ वाजता ३१५ इतका होता, तर गोवंडी, शिवाजीनगर आणि मालाड येथे ‘वाईट’ हवेची नोंद करण्यात आली आहे. वाढता प्रदूषणामुळे अशा हवेत हृदय किंवा फुफ्फुसांचा आजार असलेल्यांनी, गर्भवती महिलांनी आणि लहान मुलांनी जास्त काळ घराबाहेर राहू नये, असा सल्ला दिला जात आहे. घराबाहेर पडताना शक्य असल्यास मास्कचा वापर करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पुढील काही दिवस मुंबईच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने हवा प्रदूषणात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR