25.5 C
Latur
Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीसांची आकडेमोड; विधानपरिषद जिंकणार?

फडणवीसांची आकडेमोड; विधानपरिषद जिंकणार?

भाजप आमदारांना दिली मतदानाची गुरुकिल्ली

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत पाच उमेदवार उतरवणा-या भाजपने कोणतीही कसर न ठेवता सर्व तयारी निशी रिंगणात उतरायचे ठरवले आहे. बुधवारी मतदान कसे करावे, याची पहिली मॉकड्रील झाली तर दुसरी मॉकड्रील गुरुवारी अधिक गंभीरपणे होणार आहे. सकाळी दहा वाजता होणा-या या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवही उपस्थित राहतील.
विधान परिषदेसाठी आपल्याकडे पुरेसे बहुमत आहे.

आपल्या मित्रपक्षांनाही आपल्याला जिंकवून द्यायचे आहे असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री उशिरा मतदान कसे करायचे, हे भाजप आमदारांना समजावून सांगितले. गुरूवारी दुपारी फडणवीस आणि त्यांच्या विश्वासू सहका-यांनी मतांची आकडेमोड निश्चित केली. त्यात भाजपच्या पाच उमेदवारांना कसे निवडून आणता येईल, त्यासाठीचे नियोजन कसे असेल, सहकारी पक्षांना मते कशी हस्तांतरीत करायची याबद्दलचे विस्तृत विवरण करण्यात आले. आमदारांच्या या बैठकीत सविस्तर माहिती निश्चित करण्यात आली. आमदारांच्या रात्री झालेल्या या बैठकीत तज्ञांनी मार्गदर्शन केले.

शिवसेना शिंदे गटाकडे ४८ मते
भाजपचे सर्व आमदार आता पक्षादेशाप्रमाणे मतदान करणार आहेत. या बैठकीत काय सांगितले गेले ते बाहेर कुठेही बोलू नये, अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. भाजपकडे दोन मते कमी आहेत पण वेळेवर तसा पाठिंबा मिळेल, असे मानले जाते. नेत्यांचे गणित स्पष्ट आहे. शिवसेना शिंदे गटाकडे अपक्ष आमदारांसह ४८ मते आहेत. त्यांचे दोन्ही उमेदवार जिंकतील हे स्पष्ट आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR