27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रनड्डांपेक्षा फडणवीस, महाजन मोठे नेते

नड्डांपेक्षा फडणवीस, महाजन मोठे नेते

एकनाथ खडसे यांची टीका

जळगाव : प्रतिनिधी
भाजपमध्ये जे. पी. नड्डा यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला होता. तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता. मात्र, मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केल्याने तो जाहीर झाला नाही. याचा अर्थ नड्डा यांच्यापेक्षा गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते मोठे आहेत, असे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

मी संभ्रम अवस्थेत आहे, कन्फ्युज आहे हे मान्य आहे. गेली पाच ते सहा महिने भाजपने मला प्रवेश देऊनही तो जाहीर केला नाही. याचा अर्थ माझी त्यांना आवश्यकता नाही असेच दिसत आहे. काही अडचणींमुळे मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या अडचणी आजही कायम आहेत. भाजपाला गरज नसेल तर माझा मूळ पक्ष काय वाईट आहे, मी या ठिकाणी आमदार आहे, चार वर्ष आमदार राहणार आहे.

अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उभ राहणार, अशी चर्चा आहे. आपल्या विरोधी लोकांना राजकीय हेतूने संपविण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे. अनिल देशमुख दबावाने काम करत असतील तर ते राजकीय व्यक्ती आहेत. मात्र अधिका-याने कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करायला हवे होते. कोणीही दबाव आणला तरी नियमाने काम करणे हे अधिका-याचे काम होते. अनिल देशमुख यांच्या दबावाला बळी पडून काम करणारा अधिकारी दोषी आहे. राजकीय परिस्थिती बदलत आहे, तशी परिस्थिती बदलत आहेत, असेही खडसे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR