24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रफडणवीस मनोरुग्ण गृहमंत्री; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

फडणवीस मनोरुग्ण गृहमंत्री; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन, अभिषेक घोसाळकर हत्याकांडासह राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारीवर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर तुफान हल्लाबोल केला. कायद्याचे धिंडवडे निघाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत, त्यांना मी कलंक म्हणालो होतो, पण आता ते मनोरुग्ण गृहमंत्री आहेत का असा सवाल आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. याशिवाय मॉरिसने अभिषेकला गोळी मारल्याचे आणि मॉरिसने आत्महत्या केल्याचे फुटेज बाहेर आले नाही, ते दाखवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याचे फेसबुक लाईव्हदरम्यान दिसले. पण ज्या मॉरिस नोरोन्हाने गोळीबार केल्याचे म्हटले जाते ते त्यामध्ये दिसले नाही. मॉरिसने नंतर आत्महत्या केली. ती आत्महत्या त्याने का केली असावी? अभिषेकची हत्या झाली, गुंडाने ती हत्या केली. या गुंडाने स्वत: आत्महत्या का केली? हा सुद्धा प्रश्न आहे. अभिषेकवर गोळ्या झाडल्या पण कोणी झाडल्या हे कळत नाही. बॉडीगार्ड मॉरीसने ठेवला होता, का ठेवला होता? या दोघांना मारण्याची कोणी सुपारी दिली होती का? असा संशय आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? गेले काही दिवस उद्विग्न अवस्था आहे. बेबंदशाही सुरू आहे. महाराष्ट्राची जनता कमालीची दुखावली गेली आहे. गुंडांचा हैदोस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे.
अभिषेकची हत्या झाली, गुंडाने ती हत्या केली. या गुंडाने स्वत: आत्महत्या का केली? हा सुद्धा प्रश्न आहे. अभिषेकला गोळ्या झाडल्या पण कोणी झाडल्या हे कळत नाही. बॉडीगार्ड मॉरीसने ठेवला होता, का ठेवला होता? या दोघांना मारण्याची कोणी सुपारी दिली होती का? असा संशय आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यपालांनी या गुंडाचा सत्कार केल्याचे फोटो समोर आले आहेत, सत्कार करताना पार्श्वभूमी तपासली जात नाहीत का? काल निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. तो हल्ला भाजपच्या लोकांनी केला.
फडणवीस यांना कलंक, फडतूस शब्द वापरले. पण आता गृहमंत्री मनोरुग्ण म्हणून लाभला आहे का? फडणवीस असे बोलले की, श्वान गाडीखाली आला तर राजीनामा मागतील. कुत्रा काय सगळ्या प्राण्यांची जबाबदारी तुमची आहे. दिल्लीश्वरांसमोर तुम्ही कुत्र्यासारखी शेपटी हलवता, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला बाईंनी पत्र लिहिलं. असं पहिल्यांदा होतंय की पोलिस महासंचालकांचं अशाप्रकारे पत्र समोर आणताय.राज्य सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी आम्ही जनता न्यायालयात करत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यपालपदाचा अर्थ राहिला नाही
आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही, त्या पदाचा काही अर्थ राहिला नाही. माझी तळमळ सर्वोच्च न्यायालय समजून घेऊन लवकर निर्णय घेईल. एकच आशा आता सर्वोच्च न्यायालयाकडून आहे. लवकर निवडणुका जाहीर करतील किंवा यावर लवकर निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR