32.6 C
Latur
Monday, March 17, 2025
Homeमहाराष्ट्रफेब्रुवारीपासून फडणवीसांच्या प्रचाराचा धडाका

फेब्रुवारीपासून फडणवीसांच्या प्रचाराचा धडाका

दररोज तीन सभा घेणार

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४५हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्याअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराचा धडाका उडवून देणार आहेत. फडणवीस राज्यभर मॅरेथॉन दौरा करणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार असून ते फेब्रुवारीपासून दररोज ३ सभा घेणार आहेत. लवकरच या दौ-याचे वेळापत्रक जाहीर होईल. महायुतीच्या आमदार आणि खासदारांसोबत फडणवीस प्रचार करणार आहेत. केंद्रात नरेंद्र मोदींना तिस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशनंतर मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यापैकी महायुतीने ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने फेब्रुवारीपासून राज्यात प्रचाराचा धडाका लावण्याचे निश्चित केले आहे. राज्यातील भाजपचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस या निमित्ताने राज्य पिंजून काढणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR