16.5 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमनोरंजनफरहान अख्तर तिस-यांदा बाबा होणार?

फरहान अख्तर तिस-यांदा बाबा होणार?

शबाना आझमीने फेटाळल्या अफवा

मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर व त्याची मराठमोळी बायको शिबानी दांडेकर आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तीन वर्षांपूर्वी लग्न करणारे शिबानी व फरहान आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत, असे म्हटले जात होते. या सर्व चर्चांवर फरहान अख्तरची सावत्र आई ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फरहान अख्तर आज ५१ वर्षांचा झाला. दोन मुलींचा बाबा असलेला फरहान लवकरच शिबानीबरोबर पहिल्या बाळाचं स्वागत करणार असल्याच्या चर्चा होत होत्या. शबाना आझमी यांनी या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे शबाना यांनी स्पष्ट केले आहे.

फरहान अख्तरने फेब्रुवारी २०२२ मध्ये शिबानी दांडेकरशी एका खासगी समारंभात लग्न केले होते. फरहानचे हे दुसरे लग्न होते. त्याआधी त्याचं लग्न अधुना भाबानीशी झाले होते. या जोडप्याने २००० साली लग्न केले होते. ते १७ वर्षांच्या संसारानंतर २०१७ मध्ये विभक्त झाले. फरहान व शिबानीला शाक्य व अकिरा या दोन मुली आहेत. अधुनापासून घटस्फोट घेतल्यावर फरहानच्या आयुष्यात शिबानी आली. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर दोघांनी तीन वर्षांपूर्वी लग्न केलं. आता हे दोघेही आई-बाबा होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या, मात्र शबाना आझमी यांनी या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.

फरहान अख्तरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो लवकरच ‘१२० बहादूर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धात प्राण गमावणा-या १२० सैनिकांवर आधारित ‘राह’ सिनेमा आहे. याव्यतिरिक्त फरहान रणवीर सिंहबरोबर ‘डॉन ३’ मध्ये तर कियारा अडवाणीबरोबर ‘किट्टी’ सिनेमात झळकणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR