बुलडाणा : प्रतिनिधी
शेतकरी नेता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलडाण्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. सलग तीन टर्म खासदार असलेले शिवसेने उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात रविकांत तुपकर यांनी दंड थोपटले आहेत.
रविकांत तुपकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. लोक माझ्या पाठिशी आहेत. लोकांच्या प्रश्नांसाठी मी लढा देतोय. सामान्य शेतक-यांचा मला पाठिंबा आहे, असे रविकांत तुपकर म्हणाले.
महायुतीवर निशाणा
अनेक संघटना पाठिंब्यासाठी येतील. लढत ही फक्त महायुतीच्या उमेदवारामध्ये आणि माझ्यात होणार आहे. एका तरुणाने माझ्यासाठी त्याच्या बायकोचे मंगळसूत्र विकले. सोबतचे अनेक लोक वर्गणी देत आहेत. भूमिपुत्र गाडीवर लिहून होत नाही. आपण कामातून दाखवून द्यायचं असतं की मी भूमिपुत्र आहे म्हणून. भूमिपुत्र आहे म्हणता तर सोयाबीन प्रश्नावर किती बोलले तुम्ही?, असा सवाल रविकांत तुपकरांनी केला आहे.