22.4 C
Latur
Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्रशेतक-यांनी १ रुपया भरून पीक विमा काढा

शेतक-यांनी १ रुपया भरून पीक विमा काढा

कृषी मंत्री धनंजय मुंडेंचे आवाहन

खामगाव : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतक-यांनी १ रुपयात विमा हप्ता भरून सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अतिवृष्टी, वादळ, पूर या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या होणा-या नुकसानीपासून शेतक-यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे चालू वर्षात या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत १५ जुलै ही आहे. खरीप २०२४ हंगामात पेरण्या सुरू झाल्या आहेत. शेतक-यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाने पीकविमा पोर्टल ६६६.स्रोु८.ॅङ्म५.्रल्ल सुरू करण्यात आले आहे. शेतक-यांनी एक रुपया भरून आपल्या पिकाचा विमा घ्यावा असे आवाहन केले आहे. तसेच विमा काढण्यासाठी काही अडचण असल्यास तालुकास्तरावर पीक विमा प्रतिनिधी यांची नियुक्ती केलेली आहे आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता, असेही नमूद केले आहे.

कसा लाभ घेता येईल योजनेचा?
योजनेमध्ये खामगाव तालुक्यात खरीप कापूस, सोयाबीन, तूर, मूग, मक्का, ज्वारी ही पिके समाविष्ट आहेत. या सर्व पिकांचा विमा आपण प्रती अर्ज १ रुपयात काढू शकता. आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा, पिक पेरा स्वयंघोषणापत्र ही कागदपत्रे देऊन आपण आपला विमा स्वत: पोर्टल वरून किंवा सीएससी सेंटर व बँकमधून काढू शकता, असे तालुका कृषी अधिकारी निमकर्डे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR