23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयदिल्लीत शेतकरी मोर्चा; इंटरनेट बंद, हरयाणा-पंजाब बॉर्डर सील

दिल्लीत शेतकरी मोर्चा; इंटरनेट बंद, हरयाणा-पंजाब बॉर्डर सील

नवी दिल्ली: दिल्लीत पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी कूच केली आहे. १३ फेब्रुवारी रोजी दिल्ली चलोची हाक शेतकरी संघटनांनी दिली आहे. यामध्ये सुमारे २०० शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत.

किमान आधारभूत किंमतीसह इतर मागण्यांसाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याच्या उद्देशानं हा मोर्चा निघाला आहे. पण हरयाणातून निघालेल्या या शेतक-यांना थोपवण्यासाठी दिल्ली-हरयाणा बॉर्डर सील करण्यात आली. तर हरयाणात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मझदूर मोर्चा यांनी ‘दिल्ली चलो’ ची हाक दिली आहे. यामध्ये सुमारे २०० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर हरयाणातील अंबाला, कुरुक्षेत्र, कैथाल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा इथंली इंटरनेट सेवा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बंद केली आहे.

त्याचबरोबर बल्क एमएमएस आणि सर्व प्रकारच्या डोंगल इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये फक्त व्हॉईस कॉलची सेवाच सुरु राहणार आहे. ११ फेब्रुवारी सकाळी ६ वाजल्यापासून १३ फेब्रुवारी रात्री बारा वाजेपर्यंत ही इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. त्याचबरोबर पंजाब, हरयाणा बॉर्डर अंबाला, ंिजद आणिफतेहाबाद जिल्ह्यात बंद करण्यात आल्या आहेत. हरयाणा पोलिसांकडून इथं बॅरिकेंिटग करण्यात आलं आहे. इतर प्रवाशांना पोलिसांनी आवाहन केलं आहे की, त्यांनी चंदीगडून दिल्लीला जाण्यासाठी देराबास्सी, बरवाला/रामगड, सहा, शाहबाद, कुरुक्षेत्र, पंचकुला, कर्नाल आणि राष्ट्रीय महामार्ग ३४४ यमुनानगर पिपली असा प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR