धाराशिव : सोलापूर : बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे गुरुवारी संध्याकाळी एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुणांचा मृत्यू झाला असून तिनही तरुण गाडी खाली चिरडून जागीच ठार झाले आहेत.
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुण गाडी खाली चिरडून ठार झाले. कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे अशी तीन तरुणांची नावे आहेत. हे तिघेही धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होते. हे तिघे मित्र धाराशिवहून बार्शीकडे निघाले होते. यावेळी पुण्याहून धाराशिवकडे निघालेली एसटी बस आणि दुचाकीचा तांदुळवाडी येथे भीषण अपघात झाला.