26.5 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रपूजा खेडकरचे वडील निवडणूक रिंगणात

पूजा खेडकरचे वडील निवडणूक रिंगणात

अहिल्यानगर : पूजा खेडकरमुळे खेडकर कुटुंबीयांचे एकेक कारनामे समोर आले होते. पूजाच्या आईवडिलांनी घटस्फोट दाखविला होता. परंतू माजी सरकारी अधिकारी, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत पत्नीविषयी माहिती दिली होती. आता मुलगी वादात सापडल्यानंतर विधानसभेला पत्नीच्या रकान्यामध्ये ‘लागू नाही’ असा उल्लेख केला आहे.

दिलीप खेडकर यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांचे अ‍ॅफिडेविट निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध झाले आहे. दिलीप खेडकर यांची पत्नी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. हे दोघेही सहआरोपी आहेत. जमीन हडपल्या प्रकरणी शेतक-यांना बंदूक उगारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दिलीप खेडकर यांनी आता महाराष्ट्र विधानसभेसाठीच्या शपथपत्रात पत्नीची माहिती दिलेली नाही. लोकसभेला पत्नी म्हणून केलेला उल्लेख विधानसभेला टाळण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR