19.3 C
Latur
Tuesday, January 14, 2025
Homeमहाराष्ट्रवाल्मिक कराडसाठी महिला आक्रमक, अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न

वाल्मिक कराडसाठी महिला आक्रमक, अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न

बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आता एक महिला उलटून गेला आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली असून, वातावरण चांगलेच तापले आहे.

या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर देखील आरोप झाले. या प्रकरणात आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे, राज्यभरात आंदोलन सुरू असताना दुसरीकडे परळीत मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. वाल्मिक कराड याच्या समर्थनासाठी आता कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. परळीमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे.

वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ परळीमध्ये आंदोलन सुरू झाले आहे. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. महिला चांगल्याच आक्रमक झाल्या असून अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान वाल्मिक कराडच्या काही समर्थकांनी पाण्याच्या टाकीवर चढून देखील आंदोलन केले आहे. याचदरम्यान एका आंदोलकाला भोवळ आल्याची देखील घटना घडली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR