बाडमेर : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय हवाई दलाचे मिग-२९ हे लढाऊ विमान येथील ग्रामीण भागात कोसळले. सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
बाडमेरच्या उत्रलाई एअरबेसजवळ हा अपघात झाला. अपघात होण्यापूर्वी पायलट विमानातून सुखरूप बाहेर पडला हे सुदैव म्हणावे लागेल. निहवाई दलाच्या प्रशिक्षण मोहिमेदरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.