32.8 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeमनोरंजन‘फायटर’ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस

‘फायटर’ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस

चार दिवसांत पार केला १०० कोटींचा टप्पा

मुंबई : हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा ‘फायटर’ हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. चार दिवसांतच कमाईमध्ये सिनेमाने १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे आहे.

‘फायटर’ हा सिनेमा २५ जानेवारी २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने २२.५ कोटींची कमाई केली. दुस्-या दिवशी ३९.५ कोटी, तिस-या दिवशी २७.५ कोटी आणि चौथ्या दिवशी २८.५० कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने ११८ कोटींचा गल्ला जमवला आहे.

‘पठाण’ या ब्लॉकबस्टरर सिनेमानंतर सिद्धार्थ आनंदचा ‘फायटर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘फायटर’ हा भारताचा पहिला एरियल अ‍ॅक्शनपट आहे. सिनेप्रेक्षकांच्या हा सिनेमा पसंतीस उतरला आहे. वीकेंडला या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. देशभरात हा सिनेमा ४३०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR