न्यूयॉर्क : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर आणण्यासाठी मस्क यांच्या कंपनीचे यान अंतराळात झेपावले आहे. सुमारे नऊ महिन्यांनी सुनिता विल्यम्स पृथ्वीवर येऊ शकणार आहे. यानात बिघाड झाल्याने ती आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरच अडकली होती.
या दोघांना परत आणण्यासाठी यान आज पहाटे रवाना करण्यात आले. नासाच्या म्हणण्यानुसार या दोघांना घेऊन १९ मार्चपूर्वी यान निघणार आहे. मस्क यांच्या स्पेस एक्सकडे ही मोहिम सोपविण्यात आली होती. नासा-स्पेसएक्स क्रू-१० हे यान झेपावले आहे.
विल्यम्स आणइ विल्मोर यांना आणण्यासाठी पाठविण्यात येत असलेल्या या यानामध्येही खराबी आली होती. गुरुवारी यामुळेच या यानाचे उड्डाण रद्द करण्यात आले होते. स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटच्या ग्राऊंड सपोर्ट क्लँम्प आर्म आणि हायड्रॉलिक सिस्टिममध्ये समस्या आली होती. ती दूर करून अमेरिकेच्या वेळानुसार शुक्रवारी सायंकाळी सात वाजता हे रॉकेट लाँच करण्यात आले.
सुनिता या गेल्या ९ महिन्यांपासून अंतराळ स्थानकावर अडकलेल्या आहेत. ५ जून २०२४ ला त्या आणि विल्मोर हे आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेले होते. परंतू, त्यांच्या स्टारलायनर यानात बिघाड झाल्याने ते अंतराळातच अडकले होते. यानंतर अनेकदा नासाने प्रयत्न केले, परंतू ते सफल होऊ शकले नाहीत. स्टारलायनरचे देखील हे पहिलेच उड्डाण होते. नासाच्या व्यावसायिक मॉडेलचा हा भाग होता, खासगी उद्योगांसोबत भागीदारी करून स्पेस स्टेशनपर्यंत मानवाचा प्रवास कमी खर्चात आणि सुरक्षितरित्या करण्यासाठी टेस्ट मिशन होते, जे फेल गेले आहे.