21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयआर्थिक फसवणूक : १.४ लाख मोबाईल नंबर ब्लॉक, ३ लाख सिम बंद; ५०० जणांना...

आर्थिक फसवणूक : १.४ लाख मोबाईल नंबर ब्लॉक, ३ लाख सिम बंद; ५०० जणांना अटक

नवी दिल्ली : केंद्र सरकारने डिजिटल फ्रॉडवर नियंत्रण ठेवण्यासाठी आतापर्यंत १.४ लाख मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत. हे मोबाईल नंबर आर्थिक फसवणुकीशी संबंधित होते. वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आर्थिक सेवा क्षेत्रातील सायबर सुरक्षेबाबत बैठक झाली.

एपीआय (एप्लिकेशन प्रोग्रांिमग इंटरफेस) इंटिग्रेशनद्वारे सिटीझन फायनान्शिअल सायबर फ्रॉड इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट सिस्टम प्लॅटफॉर्मवर बँका आणि आर्थिक संस्थांचा समावेश करण्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

निवेदनानुसार, सीएफसीएफआरएमएस प्लॅटफॉर्म नॅशनल सायबर क्राइम इन्फॉर्मेशन पोर्टलशी जोडला जाईल. यामुळे पोलीस, बँका आणि आर्थिक संस्था यांच्यात चांगला समन्वय साधता येईल.

दूरसंचार विभागाने खूप एसएमएस पाठविणा-या ३५ लाख प्राथमिक युनिट्सचे विश्लेषण केले. यापैकी १९,७७६ एसएमएस पाठवण्यात गुंतलेल्या संस्थांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. या संदर्भात ५०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून अंदाजे ३.०८ लाख सिम ब्लॉक करण्यात आले आहेत. देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, विशेषत: सायबर गुन्हेगार लोकांना कॉल करून फसवणूक करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR