22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयदिल्लीच्या ‘बेबी केअर’ रुग्णालयाला आग; ७ नवजात बालकांचा मृत्यू

दिल्लीच्या ‘बेबी केअर’ रुग्णालयाला आग; ७ नवजात बालकांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील विवेक विहार येथील न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या अपघातात सात नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. पाच नवजात बालकांवर अन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातून १२ नवजात बालकांची सुटका करण्यात आली. यातील सहा नवजात बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने उग्र रूप धारण केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, बेबी केअर सेंटरमध्ये आग लागल्याचे समजताच घटनास्थळी घबराट पसरली. आरडाओरडा होत असताना स्थानिक लोक मदतीसाठी धावले. काही वेळातच आगीने वरच्या मजल्याला कवेत घेतले. पोलिस आणि अग्निशमन विभागासह आजूबाजूच्या लोकांनी इमारतीच्या मागील बाजूच्या खिडक्या तोडून नवजात बालकांना एक एक करून बाहेर काढले.आगीची माहिती तातडीने अग्निशमन विभागाला देण्यात आली.

माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन विभागाच्या पथकाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि एक एक करून मुलांना वाचवण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्सिजन सिलेंडर रिफिल करत असताना सिलिंडरचा स्फोट झाला. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR