जालना : जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालना शहरातील मंठा चौफुली भागात गोळीबार करण्यात आला असून या गोळीबाराच्या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. गोळीबारात मृत्यू झालेला व्यक्ती अनेक गुन्ह्यात आरोपी असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. गजानन तौर असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन आरोपींकडून गजानन तौर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आल्याची घटना जालना शहरात उघडकीस आली आहे. या गोळीबाराच्या घटनेत गजानन याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. सोबतच आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक देखील नेमण्यात आल्याची माहिती मिळत आहे.