बीड : प्रतिनिधी
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख या प्रकरण तापले आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कालही संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्ह बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा काढण्यात आला. बीडमध्ये हे सर्व सुरू असतानाच बीडच्या परळीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. परळीमध्ये पुन्हा एकदा हवेत गोळीबार केल्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहे. या प्रकरणी परळी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
परळी तालुक्यात हवेत गोळीबार करतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या प्रकरÞणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच एकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता परळी ग्रामीण पोलिसांनी आणखी तीन जणांवर गुन्हे दाखल केल्यची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे हवेत गोळीबार करणा-यांनीच त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले होते.
परळीचे माणिक हरिश्चंद्र यांच्याकडे परवानाधारक बंदूक असून त्यांनीच बंदुकीसह फोटो काढून तो सोशल मीडियात अपलोड केला होता. हा फोटो अपलोड करून त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच शस्त्रसंबंधी परवान्यातील नियमांचेही उल्लंघन केले. त्यानंतर पोलीस कर्मचारी विष्णू घुगे यांच्या तक्रारीवरून माणिक हरिश्चंद्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी १४ सप्टेंबर २०२३ रोजी पांगरी कॅम्प येथे परवानाधारक जयप्रकाश उर्फ बाळू रामधन सोनवणेने १२ बंदुकीतून हवेत गोळीबार करत त्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर सोनावणेविरोधात परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय कुणाल श्रीकांत यानेही बंदुकीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. पण कुणालकडे बंदुकीचा परवाना नसतानाही त्याने फोटो अपलोड केले होते. आता यासर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.